अर्थाचा अनर्थ टाळायचा असेल तर आर्थिक साक्षर व्हा.
पैसा, जीवनातील अविभाज्य घटक आहे. ज्याच्या शिवाय तुमचा एकही दिवस सुरूवात होत नाही किंवा संपत नाही. परंतु दिवसभरात आपण ज्या पैशाबद्दल विचार करतो किंवा त्याचा वापर करतो त्याबद्दल खरच आपणास कितीत माहिती आहे, जसे तो कसा वापरायचा? कसा वाढवायचा? किंवा याबद्दल आपण काही नवीन शिकण्यासाठी किती वेळ देत आहात? आणि अशा अजाणतेपणी पैशाचा योग्य उपयोग करण्यापेक्षा तुम्ही तो घालवत तर नाहीना? हा प्रश्न स्वताला विचारा.
आर्थिक साक्षर होणे म्हणजे पैशाला जाणून घेणे, त्याच्याबद्दल समजून घेणे म्हणजे थोडक्यात काय तर पैशाची भाषा शिकणे व जेव्हा एखादी भाषा तुम्हाला येते तेव्हा संवाद सुलभ होतात, एकमेकांना समजून घेऊन एक आपुलकीच नात निर्माण करून आर्थिक स्वातंत्र्य साध्य करता येत म्हणूनच मी म्हणतो कि आर्थिक साक्षर व्हा व पैशासोबतच नातं मजबूत करून फायद्यात राहा व भविष्यात होणारे नुकसान वाचवा.